नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने अजून एक मोठी कामगिरी फत्ते केली आहे. भारतीय रेल्वे विभागाने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन विकसीत केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी याविषयीची माहिती दिली. भारतीय रेल्वेने हायड्रोजन इंधनावर चालणारे ट्रेन इंजिन जगातील सर्वाधिक हॉर्स पॉवरचे इंजिन आहे.
जगातील केवळ चार देशांकडेच असे ट्रेन इंजिन आहे. ते पण 500 ते 600 हॉर्स पॉवर दरम्यान असलेल्या इंजिनाचे उत्पादन करतात. तर भारतीय रेल्वेने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत हे इंजिन विकसीत केले आहे. या इंजिनाची क्षमता1200 हॉर्स पॉवर अशी आहे.
रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितले की इंजिनचे काम पूर्ण झाले आहे. सिस्टिम इंटीग्रेशनचे काम सुरू आहे. हे इंजिन पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. भारतीय तंत्रज्ञानाने जागतिक बाजारात स्वत:ला सिद्ध केल्याचे ते म्हणाले.
हायड्रोजन ट्रेन इंजिन पर्यावरण पूरक असेल. ही ट्रेन शून्य कार्बन उत्सर्जन करेल. ही भारतातील स्वच्छ ऊर्जा आणि अक्षय ऊर्जेवर आधारीत दळणवळणासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या इंजिनचे पहिले परीक्षण हरयाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर होईल. 89 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर हायड्रोजन ट्रेनची चाचणी होईल. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 35 हायड्रोजन फ्यूल सेल ट्रेन विकसीत करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 2800 कोटी रुपये दिले होते.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |