सातारा : २५ वर्षीय युवतीला रस्त्यात अडवून मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी शुभम राजेंद्र भोसले (रा. मोळाचा ओढा) याच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रात्री सुमारे पावणे आठ वाजता घडलेल्या या घटनेत आरोपीने ''माझ्याशिवाय इतर कोणाशी मैत्री करायची नाही, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला सोडणार नाही,'' अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. दोघांची तीन वर्षांपासून ओळख असल्याची माहिती आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहेत.