सातारा : पतीकडे पाहून हसल्याच्या कारणावरून एका महिलेच्या पतीला फोनवरून तसेच महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पवाराची निगडी, ता. जि. सातारा येथे दि. २७ रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अंगणवाडी मदतनीस पद्मा कैलास रणबागले (वय ४२, रा. पवाराची निगडी, ता. जि. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मेहबूब सलीम इनामदार व त्याचा मित्र ओंकार लोंढे (दोघे रा. पवाराची निगडी, ता. जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संशयित हे एकाच गावातील असून एकमेकांच्या परिचयाचे आहेत. फिर्यादी यांच्या पतीने आपल्याकडे पाहून का हसले, असा जाब विचारत संशयितांनी फोनवरून तसेच फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोर येऊन शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
एकाला शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 28 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा