भाजप महिला मोर्चाकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

साताऱ्यात शिवतीर्थावर जोरदार घोषणाबाजी;

by Team Satara Today | published on : 13 September 2025


सातारा,  दि. 13  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीवर काँग्रेसचे नेते व महासचिव राहुल गांधी यांनी वादग्रस्त टिपणी केली.  त्याबाबतचा एय व्हिडिओ बिहार प्रचार दौऱ्या दरम्यान जाहीर करण्यात आला. या घटनेचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सातारा गाडीच्या वतीने येथील पोवई नाक्यावर निषेध करण्यात आला. 

या मोर्चामध्ये महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, सचिव सुनेशा शहा, भारतीय जनता पार्टीच्या बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाच्या जिल्हाध्यक्ष अनिता हुबळीकर तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीवर जे वादग्रस्त वक्तव्य केले त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.  राहुल गांधी यांनी राजकारण करताना जी व्यक्तिगत स्वरूपाची टीका सुरू केली आहे,  यामध्येच त्यांचे वयफल्य दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर भारतातील तमाम जनतेने विश्वास दाखवला आहे.  त्यामुळे काँग्रेसचे नेते अशा व्यक्तिगत पातळीवरच्या टीका करत आहेत.  त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी भावना या निषेध आंदोलनातून व्यक्त झाली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अतिवृष्टीमुळे बाधितांना 73 कोटी 54 लाखाची मदत जाहीर
पुढील बातमी
ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी शृष्टी शिंदेची निवड

संबंधित बातम्या