साताऱ्यात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी; पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन होणार

by Team Satara Today | published on : 25 January 2026


सातारा :  ७७ व्या प्रजासत्ताक सोहळ्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून येथील शाहू स्टेडियम व  पोलीस कवायत मैदानावर पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे.सातारा शहर प्रजासत्ताकमय झाले आहे.

प्रजासत्ताक दिन हा शांततेत पार पाडण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून प्रतिबंधात्मक कारवायांचे सत्र आरंभ होण्यात आले आहे. तसेच आंदोलकांना सुद्धा सूचना वजा नोटीसा बजावण्यात आले असून शांततामय मार्गाने आंदोलकांशी चर्चा करून त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.शाहू स्टेडियम व  पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री शंभूराज देसाई  व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन होणार असून सातारा जिल्हा पोलीस दलाची परेड तसेच पोलिसांना उत्कृष्ट कामगिरीनिमित्त पोलीस मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने पोलीस कवायत मैदानावर टॅंकरने पाणी मारून मैदान टवटवीत केले आहे. 

ठिकठिकाणी मैदानाची आखणी करण्यात आली असून संचलन व्यासपीठ आणिपरेड साठी करावयाचा प्रोटोकॉल याची सुद्धा रंगीत तालीम घेण्यात आली सातारा पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांची माहिती मागवली असून जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस कवायत मैदान तसेच शहरातील एन्ट्री पॉईंट्स येथे पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे .या सर्व तयारीचा आढावा स्वतः पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्वतः घेतला आहे.

सातारा शहर सुद्धा प्रजासत्ताकमय झाले असून शुभेच्छा देणारे शुभेच्छा फलक झळकू लागले आहेत. सातारा शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त केशर जिलेबी खरेदी करून त्याच्या सेवनाची मोठी परंपरा आहे .सातारा शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी टीम टन जिलेबीला मागणी असते .त्यामुळे शहरातील मिठाई विक्रेत्यांनी याची तयारी केली असून जिलेबीचे मोठे घाणे हॉटेलच्या बाहेर सजू लागले आहेत. जे सातारकर प्लास्टिक पिशवी वगळून डब्यातून जिलेबी नेतील अशा सातारकरांना जिलेबीच्या खरेदीत सवलत देण्याचे धोरण काही संस्थांनी जाहीर केले आहे. पर्यावरण मुक्तीच्या या जागरूक धोरणाचे स्वागत करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी साताऱ्यातील सेल्फी पॉईंटवर स्वतःचे फोटो काढण्याचे आता नवीन सत्र सुरू झाले आहे .हे लक्षात घेऊन सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने येथील सेल्फी पॉईंटची स्वच्छता केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बांधकाम विभागाच्या अतिक्रमणाविरोधात आत्मदहनाचा इशारा; रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांचे निवेदन
पुढील बातमी
साताऱ्यात मेडिकल कॉलेजसाठी प्राध्यापकांची भरती; प्रशासनाने मागविले करार तत्वावरचे प्रपाठक

संबंधित बातम्या