सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मार्च 2024 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान सुप्रिया सागर चिकणे या विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती सागर चिकणे सासू लक्ष्मी चिकणे, नणंद विद्या मांढरे राहणार (पुणे), पूजा अशितोष जेधे (रा. लंडन) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलिस हवालदार सुडके करीत आहेत.