सातारा : सातारा शहर पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून नऊ जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात असणाऱ्या भवानी मटन शॉप जवळच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशास जुगार प्रकरणी जयदीप पोपटराव यादव रा. वाढे ता. सातारा, अभिजीत अशोक चौगुले रा. मंगळवार पेठ सातारा, अभय प्रभाकर मांडोळे रा. सदर बाजार सातारा, धनंजय शिवाजी भोंडवे रा. सदर बाजार सातारा, भारत पूनमचंद सोलंकी रा. सदर बाजार सातारा, अनिल दशरथ खंडाळे रा. शनिवार पेठ सातारा, करण अनिल लादे रा. सदर बाजार सातारा, केदार मुरलीधर नलवडे रा. खेड सातारा आणि आकाश हनुमंत पवार रा. सैदापूर तालुका सातारा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 53 हजार 270 रुपये किंमतीचे 6 मोबाईल, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.