जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मिळालेल्या वाहनांचे लोकार्पण

पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर : पालकमंत्री शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 01 June 2025


सातारा : सातारा जिल्हा बहुतांश डोंगरी व दुर्गम आहे. या भागात कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला वाहनांसह आत्याधुनिक साहित्य देण्यात येत आहे. पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाने वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबणीस यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस विभागाकडून चांगल्या कामाची अपेक्षा सर्व जण करतात यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून 15 स्कॉर्पीओ, 1 थार, 4 मोठ्या बसेस,दामिनी पथकासाठी 16 प्लेझर स्कूटी मिळाल्या आहेत. दामिनी पथकातील महिला पोलीस शाळा, महाविद्यालय, क्लासेस व गर्दीच्या ठिकाणी गस्त घालतील.

पोलीस विभागाला आवश्यक त्या सर्व गोष्टी दिल्या जातील. सातारा पोलीस दलाचे काम उठावदार आहे ते आणखीन उठावदार होण्यासाठी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेतून 15 स्कॉर्पीओ, 1 थार, 4 मोठ्या बसेस, दामिनी पथकासाठी 16 प्लेझर स्कूटी मिळाल्या आहेत. पोलीस विभाग सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करीत आहे. सातारा पोलीस विभाग या पुढेही उत्तम पद्धतीने काम करील, असे पोलीस अधीक्षक दोशी यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री देसाई यांनी हिरवा झेंडा दाखून वाहने मार्गस्थ केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जनता बँकेच्या सुलभ कर्ज योजनांचा लाभ घ्यावा : अमोल मोहिते
पुढील बातमी
सदरबझार परिसरात चैन स्नॅचिंग

संबंधित बातम्या