पुसेगावात मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला; जखमी पाच विद्यार्थी खाजगी रुग्णालयात

by Team Satara Today | published on : 26 February 2026


पुसेगाव  : पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयातील विद्यार्थ्यांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली. मधमाश्यांनी चावा घेतल्याने 11 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात मुख्याध्यापकांसह चार शिक्षकही जखमी झाले.

पुसेगाव येथे एकाच प्रांगणात रयत शिक्षण संस्थेचे सेवागिरी विद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालय आहे. विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग आहेत. बुधवारी दुपारी विद्यालयात नेहमीप्रमाणे अध्यापनाचे काम सुरू होते. त्यावेळी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीच्या खिडकीवर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यावरील मधमाश्यांनी उडून वर्गातील विद्यार्थ्यांवर हल्ला करत चावा घेतला. 

यामुळे विद्यार्थी आरडाओरड करु लागल्याने विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी धाव घेतली. मधमाशांनी हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली. शिक्षकांनी शाळेतील सर्वच मुलांना या हल्ल्यातून सुखरूप वाचवले. जखमी पाच विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मधमाशा चावल्यानंतर काही जणांना सूज, चक्कर येण्याचा त्रास होत होता. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गरिबी, उपासमार व असुरक्षिततेच्या छायेत मातेने केला पोटच्या लेकरांचाच सौदा; मिरजेत आईने दोन मुलांना २० हजारांत विकले
पुढील बातमी
विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा धोम येथे 28 फेब्रुवारी रोजी

संबंधित बातम्या