जयसिंगपूर येथे 24 व्या ऊस परिषदेचे आयोजन; माजी खासदार राजू शेट्टी यांनी साताऱ्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद

by Team Satara Today | published on : 10 October 2025


सातारा  : जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथे 24 व्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऊस परिषदेचा पश्चिम महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे याकरिता शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी साताऱ्यातील शेतकऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची येथील शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक झाली. या बैठकीला राज्य सदस्य अर्जुन भाऊ साळुंखे राज्य प्रवक्ते अनिल पवार, पक्षाध्यक्ष देवानंद पाटील, राज्य सरचिटणीस सूर्यभान जाधव, उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, रमेश पिसाळ, दत्तू काका घाडगे, जीवन शिर्के, बापूराव साळुंखे, प्रमोद जगदाळे, महादेव डोंगर, नितीन काळंगे, उमेश घाडगे, चंद्रकांत काटकर, ज्ञानेश्वर अर्जुन इत्यादी सदस्य उपस्थित होते. 

या बैठकीत निसर्गाचा लहरीपणा त्यामुळे शेतकऱ्यांची पीक हंगामासाठी झालेले अडचण तसेच सततच्या पावसामुळे ऊस वाढ आणि त्यामुळे दरावर झालेला परिणाम यांच्यावर चर्चा करण्यात आली शेतकऱ्यांच्या उशाला योग्य आणि उच्चांकी दर मिळावा याकरिता शेतकरी संघटना पुन्हा सज्ज झाली असून जर कारखानदार सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करतील तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आश्वासना संदर्भातही या बैठकीत राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सरकारने दिलेल्या शब्द जर पाळला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना दिवाळीनंतर तीव्र आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासंदर्भात योग्य उमेदवारांना संधी देण्याकरिता संघटनेची यंत्रणा सक्रिय होऊन याबाबत चर्चा केली जाणार आहे या निवडणुका स्वबळावर की स्थानीय आघाडी यासंदर्भाने लवकरच निर्णय घेतला जाईल असे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचारी कृती समितीचे साताऱ्यात धरणे आंदोलन; वीज वितरणचे संपूर्ण काम ठप्प
पुढील बातमी
पूर्णाहूतीने सहस्त्रचंडी याग सोहळ्याची शुक्रवारी सांगता; वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन

संबंधित बातम्या