कारखानदारांनो, एफ.आर.पी वेळेत द्या!

...अन्यथा रयत क्रांती संघटना आंदोलन करणार

by Team Satara Today | published on : 27 November 2024


सातारा : कारखानदार आमदार झाल्यानंतर तरी शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे व वेळेत उसाचे पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात बहुतांशी कारखाने सुरू होऊन आता एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. तरी देखील एफ.आर.पी प्रमाणे १४ दिवसाच्या आत आणि उसाचा दराप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत बहुतांश कारखानदार आमदार झाले आहेत, तर काही कारखान्यावर आमदारांचे अप्रत्यक्ष होल्ड आहे. त्यामध्ये पाटण येथील बाळासाहेब देसाई कारखान्यावर आ.शंभूराज देसाई, साताऱ्यातील कारखान्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराडच्या कृष्णा कारखाना व जयवंतराव भोसले कारखान्यावर आ.अतुल भोसले यांच्यासह फलटण येथील स्वराज कारखान्यावर माजी खा.रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्यासह कराड उत्तरचे आ.मनोज घोरपडे यांचा पडळ येथे कारखाना आहे. अशावेळी कारखानदार आमदार झाल्यानंतर तरी शेतकऱ्यांना वेळेत म्हणजेच ऊस कारखान्याला पाठविल्यापासून १४ दिवसाच्या आत एफ.आर.पी प्रमाणे उसाचे पैसे खात्यावर बंधनकारक आहे. मात्र अद्याप एक महिना उलटून देखील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. आणि अद्याप ऊस दर देखील जाहीर केलेला नाही. त्यामुळे अखेर रयत क्रांती संघटनेचे प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सिव्हिलची रक्त सुविधा अडकली लाल फितीच्या कारभारात
पुढील बातमी
तामजाई नगर मध्ये 63 हजारांची घरफोडी

संबंधित बातम्या