सातारा : आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका महिलेवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोर्ट कमिशनर यांनी फ्लॅटला सील केले असताना त्या आदेशाचा भंग करुन कुलुप तोडल्याप्रकरणी उज्वला संपतराव माने (रा.देगाव,सातारा) यांच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुधीर बबन शेळके (रा.विलासपूर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. 20 नोव्हेबर रोजी ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 29 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा