पतीशी बोलल्याच्या रागातून शेजारी महिलेला शिवीगाळ; अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

by Team Satara Today | published on : 28 September 2026


सातारा : पतीशी बोलल्याच्या रागातून शेजारी महिलेने महिलेला शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना संभाजीनगर, कोडोली येथे दि. २७ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत रिजवाना शब्बीर मुल्ला (वय ३६, रा. बोरगाव, ता. जि. सातारा, सध्या रा. संभाजीनगर, कोडोली, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रूपाली लक्ष्मण माने (रा. संभाजीनगर, कोडोली, सातारा) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व संशयित महिला शेजारी राहतात. तक्रारदार यांच्याशी संशयित महिलेचा पती बोलत असल्याचा राग मनात धरून तिने तक्रारदार यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून तक्रारदार यांना योग्य त्या न्यायालयातून दाद मागण्याबाबत समज दिली आहे. तसेच पुढील प्रतिबंधक कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे यांना कळविण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकाला शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात गुरुवार पेठ परिसरात दुकानासमोर पार्क केलेल्या २० हजाराच्या दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या