महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सुटणार

रस्त्यासाठी वन विभागाकडून जागा; मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

by Team Satara Today | published on : 08 October 2025


महाबळेश्वर : पोलादपूर-सुरूर हा रस्ता पर्यटन स्थळांना जोडणारा असल्यामुळे पर्यटक वाहनांची वर्दळ जास्त असते आणि यामुळे रस्ता अरुंद असल्यामुळे सुट्यांमध्ये आणि पर्यटन हंगामात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून पेट्रीट वेण्णा लेक (बाह्यवळण मार्गासाठी वन विभागाने ०.७८ हेक्‍टर जमीन रस्त्याच्या आणि पुलाच्या बांधकामासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाबळेश्वर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे. 

पोलादपूर ते सुरूर या राज्यमार्गावर प्रचंड वाहतूक असते, तसेच या मार्गावर अपघातदेखील वारंवार झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा होता. काही ठिकाणी स्थानिकांच्या तक्रारी होत्या. दरम्यान, मंत्री पाटील यांनी कामांची पाहणी करून अडचणी सोडविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलादपूर-महाबळेश्‍वर-पाचगणी-वाई राज्य मार्ग क्र. १३९ ते पेट्रीट वेण्णा लेक (बाह्यवळण मार्ग) साठी वन विभागाने ७८ गुंठे जमीन देण्यास मंजुरी दिली आहे. हा रस्ता अनेक दिवस वनखात्याच्या परवानगीसाठी थांबला होता. या मंजुरीमुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती मिळणार असून, महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.तसेच प्रदूषण कमी होऊन ,पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. व स्थानिकांचा व्यवसाय व रोजगार वाढेल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फटाक्यांच्या ठिणगीमुळे दुकानाला आग
पुढील बातमी
मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

संबंधित बातम्या