पंडित जसराजच्या पत्नी मधुरा जसराजनी घेतला अखेरचा श्वास

वयाच्या ८६ व्या वर्षी झाले निधन!

by Team Satara Today | published on : 25 September 2024


मुंबई : प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्व व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा जसराज यांचे बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अशी माहिती त्यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी दिली आहे. मधुरा 86 वर्षांच्या होत्या आणि अनेक दिवसांपासून आजारी देखील असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मधुरा जसराज यांना दुर्गा जसराज आणि शारंग देव अशी दोन मुले आहेत. त्यांचे प्रवक्ते प्रीतम शर्मा यांनी त्यांच्या शेवटच्या प्रवासाची माहिती देणारी एक नोट शेअर केली आहे. मधुराचे पार्थिव तिच्या अंधेरी येथील निवासस्थानातून दुपारी ओशिवरा स्मशानभूमीत नेले जाईल, जिथे बुधवारी दुपारी ४ ते साडेचार दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. असे यामध्ये नोट केले दिसून येत आहे.

लेखक, चित्रपट निर्माते आणि कोरिओग्राफर म्हणून सक्रिय असलेल्या मधुराने 2009 मध्ये तिच्या पतीला श्रद्धांजली म्हणून ‘संगीत मार्तंड पंडित जसराज’ नावाची माहितीपट बनवला. याशिवाय त्यांनी वडील व्ही. शांताराम यांचे चरित्र आणि इतर अनेक कादंबरीही लिहिली आहे.

याआधी ऑगस्ट २०२० मध्ये पंडित जसराज यांचे वयाच्या ९० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जसराज हे शास्त्रीय गायक होते, त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. जसराज आणि मधुरा पंडित यांची मुलगी दुर्गा संगीतकार आणि अभिनेत्री आहे. तर मुलगा शारंग देव संगीत दिग्दर्शक आहे.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रायगड आणि पुण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी
पुढील बातमी
द्रोण देसाईने 498 धावांची अप्रतिम खेळी

संबंधित बातम्या