लिंब फाटा येथे चौघांना मारहाण केल्याप्रकरणी लिंब येथील सहा जणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 18 August 2026


सातारा : चौघांना मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लिंब फाटा येथील हायवे ब्रिज खाली प्रकाश मडीवळ नाटेकर (रा. नागेवाडी, ता. सातारा) यांना तसेच त्यांचा भाऊ महादेव, मुलगा शिवम आणि साहिल संतोष साळुंखे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी शुभम बरकडे, महादेव शंकर चव्हाण, सहदेव शंकर चव्हाण, पिंटू शिरतोडे, दीपक संतोष चव्हाण, राज संतोष चव्हाण (सर्व रा. लिंब, ता. सातारा) व इतर दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
अधिक परताव्याच्या आमिषाने एकाची सुमारे 27 लाखांची फसवणूक; रवी शर्मा व एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या