अंतराळवीर सुनीता विलियम्स यांना आजाराची लागण

डोळ्यांच्या प्रकाशासंदर्भात समस्येचा सामना लागतोय करावा 

by Team Satara Today | published on : 17 August 2024


नवी दिल्ली : भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अवकाशात अडकून पडले आहेत. दोघेही आंतरराष्ट्रीय अवकाश स्टेशनवर आहेत. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर कधीपर्यंत परतणार? त्या बद्दल अजूनपर्यंत कुठलीही तारीख समोर आलेली नाही. वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. आता सुनीता विलियम्सच्या प्रकृती संदर्भात नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नॅशनल एरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशनच्या (NASA) अडचणी वाढल्या आहेत.

सुनीता विलियम्स यांना स्पेस स्टेशनवर डोळ्यांच्या प्रकाशासंदर्भात समस्येचा सामना करावा लागतोय. दीर्घकाळ मायक्रोग्रॅविटीच्या संपर्कात राहिल्यामुळे हा आजार होतो. स्पेसफ्लाइट एसोसिएटेड न्यूरो-ऑकुलर सिंड्रोम म्हणून हा आजार ओळखला जातो. शरीरात फ्लूइड डिस्ट्रीब्यूशन यामुळे प्रभावित होतं. यामुळे डोळ्याच्या प्रकाशावर परिणाम होतो. यामुळे धुरकट दिसू लागतं. विलियम्स यांच्या कॉर्निया, रेटिना आणि लेंसची स्कॅनिंग करण्यात आली. आजार कितपत बळावलाय ते जाणून घेण्यासाठी हे स्कॅनिंग करण्यात आलं.

स्पेसएक्स क्रू ड्रॅगन मिशनचा पर्याय :

सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर ISS वर तैनात आहेत. नियोजनानुसार, ते बोइंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टने परतणार होते. पण या यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अजून ते अवकाशातच अडकले आहेत. नासा दोघांना पृथ्वीवर आणण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करत आहे. यात स्पेसएक्सचं क्रू ड्रॅगनच मिशन आहे.

क्रू ड्रॅगन मिशनमुळे विलियम्स आणि विल्मोर यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. असं झाल्यास विलियम्स आणि विल्मोर यांना अवकाशात आणखी काही काळ रहावं लागेल. आधी आठ दिवसाने वेळ वाढली. आता आठ महीने लागू शकतात. क्रू ड्रॅगन फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परतणार आहे. त्यामुळे बोईंगच स्टारलायनर रिकामीच पृथ्वीवर परत येईल.

सुनीता विलियम्स स्पेसएक्सच्या स्पेसक्राफ्टने पृथ्वीवर परतल्या तर तो बोइंगसाठी एक मोठा झटका असेल. कारण सध्या जी परिस्थिती निर्माण झालीय, त्यामुळे बोइंगवर टीका होतेय. नासाने स्पेसएक्सकडे हे मिशन दिलं, तर बोइंगच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. नासासमोर आव्हान स्पेससूटच सुद्धा आहे. बोइंगच्या स्टारलायनरसाठी डिजाइन केलेला सूट स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनमध्ये उपयोगाचा ठरणार नाही. मिशन स्विच केलं, तर क्रू-9 ड्रॅगनसह अतिरिक्त स्पेससूट पाठवण्यात येईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अभिनेत्री रेखा यांच्याकडे कोट्यवधी नाही तर, अब्जवधी रुपयांची संपत्ती
पुढील बातमी
लखनऊ विमानतळावर रेडियोएक्टिव मटेरियल लीक

संबंधित बातम्या