दासबोध ग्रंथ वाचन पारायण सोहळ्याने दासनवमी उत्सव कार्यक्रमांना प्रारंभ

by Team Satara Today | published on : 13 February 2025


सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या  स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या   सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने  दासनवमी  उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा शहरातील राजवाडा परिसरातील संत ज्ञानपीठ ,सांस्कृतिक केंद्र -समर्थ सदन येथे गुरुवारपासून या दासबोध ग्रंथ वाचन पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला.  दासनवमी निमित्त मंडळाचे वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये ग्रंथ वाचन, विविध क्षेत्रातील मान्यवरांचे प्रवचन, सुश्राव्य कीर्तन, मंत्र जागर, श्लोक पठण तसेच विविध महिला भजनी मंडळांची भजने कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता या दासनवमी उत्सवातील दासबोध वाचन पारायण सोहळ्यास समर्थ रामदास स्वामींच्या मूर्तीला वंदन करून प्रारंभ करण्यात आला .मनाचे श्लोक, आत्मबोध आणि इतर काही स्तोत्रे पठण झाल्यानंतर दासबोध ग्रंथाचे वाचन करण्यात सुरुवात झाली.

या पारायण सोहळ्यात सातारा शहरातील तसेच परिसरातील अनेक महिला समर्थ भक्त तसेच पुरुष भक्तही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

22 फेब्रुवारीला यावर्षी दासनवमी सोहळा संपन्न होणार आहे .तोपर्यंत दररोज सकाळी अडीच तास या ग्रंथांचे वाचन होणार आहे. त्यानंतर  दासनवमीला दुपारी महाआरती करून हातात प्रसाद वितरण केला जाणार आहे ,अशी माहिती समर्थ सेवा मंडळाचे वतिने देण्यात आली .या दासबोध ग्रंथ वाचन पारायण सोहळ्यासाठी समर्थ विद्यापीठाचे कुलपती समर्थ भक्त रमेश बुवा शेंबेकर रामदासी, समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, राजू उर्फ मुरलीधर कुलकर्णी, संतोष वाघ, सुनील कुलकर्णी, कल्पना ताडे, अनघा देसाई, रवी बुवा आचार्य, श्री.जोशी  विशेष परिश्रम घेत आहेत.या कार्यक्रमात समर्थ भक्तांनी तन-मन-धन अर्पून सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष स. भ. गुरुनाथ महाराज कोटणीस मंडळाचे कार्याध्यक्ष स.भ.डॉ. अच्युतराव गोडबोले व समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह  योगेश बुवा रामदासी यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'मितवा' या सिनेमानं 'मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या' हे दिलेलं सूत्र आजही प्रेक्षकांच्या आठवणीत
पुढील बातमी
गाढ झोप न लागण्यानं जगण्याचा तोल जातो

संबंधित बातम्या