लोणंद रेल्वे स्थानकाजवळ राईड मारून येतो असे सांगून मोटरसायकल लांबवली

by Team Satara Today | published on : 31 January 2026


सातारा : मोटार सायकलचे फीचर्स विचारून मोटरसायकलच्या मालकाकडून दुचाकी घेऊन परस्पर पळवून नेल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ऋषिकेश शिवाजी कापरे (वय 23 रा. मरीआईचीवाडी, ता. खंडाळा) जिल्हा सातारा यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

26 जानेवारी रोजी दुपारी दीडच्या दरम्यान लोणंद रेल्वे स्थानकाजवळ ऋषिकेश आपल्या अपाचे 160 या दुचाकीसह उभा असताना अज्ञात इसमाने तेथे येऊन फिर्यादीचा गप्पांमधून विश्वास संपादन केला.  मोटरसायकलची राईड मारून येतो असे सांगून 160cc ची मोटर सायकल परस्पर लांबवली. फिर्यादी कापरे यांनी बराच वेळ वाट पाहूनही तो पूर्ण परतल्याने त्यांनी संबंधितांच्या विरोधात तक्रार दिली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राष्ट्रवादीचा गड सावरण्यासाठी खुद्द सुनेत्रावहिनी पवार मैदानात
पुढील बातमी
फलटण तालुक्यातील काशीदवाडी येथे इलेक्ट्रिक मोटारीची चोरी

संबंधित बातम्या