भारताचा डाव गडगडला

न्यूझीलंडकडे भक्कम आघाडी, मिचेल सँटनरच्या 7 विकेट्स

by Team Satara Today | published on : 25 October 2024


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या. न्यूझीलंडने केलेल्या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला फक्त 156 धावा करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडकडे आता 103 धावांची आघाडी आहे.

भारताकडून यशस्वी जैस्वालने 30 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्मा एकही धावा न करता बाद झाला. शुभमन गिलने 30 धावा, विराट कोहली 1 धाव करत बाद झाला. ऋषभ पंतने 18, सर्फराज खान 11, रवीचंद्रन अश्वीनने 4, रवींद्र जडेजाने 38, वॉशिंग्टन सुंदरने 18 आकश दीपने 6 तर जसप्रीत बुमराहने एकही धाव केली नाही. न्यूझीलंडकडून सर्वाधिक मिचेल सँटनरने 7 विकेट्स घेतल्या. तर ग्लेन फिलिप्सने 2, टीम साऊदीने 1 विकेट्स घेतल्या.

काॅनवे आणि रचिन यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यानंतर वाॅशिग्टन सुंदरने न्यूझीलंडच्या डावाला सुरुंग लावला. 3 बाद 197 अशा सुस्थितीत न्युझीलंड दिसत असताना वाॅशिंग्टन सुंदरच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या 259 धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडने अवघ्या 62 धावांत 7 फलंदाज गमावले. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या दिवशी मोठे यश मिळालं. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या 59 धावांमध्ये सात बळी टिपले, तर अश्विनने सुंदर साथ देताना 64 धावांमध्ये तीन बळी टिपले. न्यूझीलंडचे चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.

पुणे कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने 259 धावा केल्या. पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला किवी संघ 259 धावांत सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून सलामीवीर ड्वेन कॉनवेने सर्वाधिक 76 धावा केल्या. याशिवाय बंगळुरू कसोटीचा हिरो रचिन रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वॉशिंग्टन सुंदरने 7 विकेट्स घेतल्या.

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह.

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साऊदी, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओरुके.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इस्रायलचा लेबनॉनमध्ये हवाई हल्‍ला
पुढील बातमी
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदील ने दिले मतदान जनजागृतीचा संदेश

संबंधित बातम्या