ज्योतिष शास्राबरोबरच खगोलीय अभ्यासकांसाठी देखील ग्रहण एक अभ्यासाची गोष्ट असते. ही खगोलीय घटना सर्वच दृष्टीने महत्वाची असते. ज्योतिषशास्रात तर त्यातून काही संकेत मिळत असतात. येत्या बुधवारी 2 ऑक्टोबर 2024 रोजी या वर्षांचे शेवटचे सुर्यग्रहण होणार आहे. हे सुर्यग्रहन संपूर्ण सुर्यग्रहण नसून वलयाकार सुर्यग्रहण आहे. ज्यास ‘रिंग ऑफ फायर’ म्हटले जाते. या दरम्यान सुर्यग्रहणात जगातील काही ठिकाणांवरुन वेगवेगळे नजारे पाहायला मिळणार आहेत, दोन ऑक्टोबर रोजी पितृ अमावस्या समाप्त होत असून श्राद्धपक्ष संपणार आहे. यावेळी श्राद्धपक्षाची सुरुवात 18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहणाने झाली होती. आता 2 ऑ्क्टोबरला सुर्य ग्रहणाने श्राद्ध पक्षाची समाप्ती होणार आहे. चला तर पाहूयात सुर्यग्रहणाची योग्य वेळ आणि भारतात ते दिसणार की नाही ?
केव्हा लागणार सूर्यग्रहण ?
भारतीय वेळेनुसार 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9.13 वाजता सुर्यग्रहणाला सुरुवात होणार आहे. आणि रात्री 3.17 वाजता सुर्यग्रहणाची समाप्ती होणार आहे. साल 2024 मध्ये दोन चंद्रग्रहण आणि दोन सुर्यग्रहण झाले होते. 2 ऑक्टोबर लागणारे ग्रहण वर्षाचे अखेरचे ग्रहण असणार आहे. यानंतर कोणतेही ग्रहण होणार नाही.
रिंग ऑफ फायर :
संशोधकांच्या मते जेव्हा सुर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात त्यावेळी सुर्यग्रहण घडते. अर्थात चंद्र परिभ्रमण करीत करीत जेव्हा सुर्य आणि पृ्थ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सुर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडत नाही. त्यासच सुर्यग्रहण म्हटले जाते. चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरत असतो. आणि त्यावेळी त्याच्या पृथ्वीपासूनच्या अंतरात देखील बदल होत असतो. कधी चंद्र पृथ्वीपासून जवळ आणि कधी लांब असतो. पृथ्वीच्या जवळ असल्यानंतर चंद्र मोठा दिसतो आणि दूर गेल्यानंतर लहान दिसतो. सुर्यग्रहणाच्या वेळी चंद्र जर पृथ्वीच्या जवळ असेल तेव्हा तो मोठा आकारामुळे पृथ्वीवरुन सुर्याला संपूर्ण झाकला जातो. तर जेव्हा तो दूर असतो तेव्हा छोट्या आकारामुळे सुर्याचा मधला आकार तेवढा झाकला जातो. त्यामुळे सुर्याचे कंकणाकृती ‘रिंग ऑफ फायर’ असे रुप दिसते. ‘रिंग ऑफ फायर’ किंवा कंकणाकृती संपूर्ण ग्रहण तीन तासांचे देखील असू शकते. परंतू प्रत्यक्षात रिंग ऑफ फायर’ ही स्थिती काही सेंकद ते 12 सेंकदाची असू शकते.
भारतातून दिसणार का रिंग ऑफ फायर ?
साल 2024 चे शेवटचे कंकणाकृती सूर्य ग्रहण प्रशांत महासागर, दक्षिण अमेरिका, अर्जैटीना, फिजी,चिली सह अन्य ठिकाणाहून दिसू शकते. परंतू साल 2024 चे हे सूर्य ग्रहण भारतातून दिसणार नाही.
सूतक काल असणार की नाही
ज्योतिषी पंडित संदीप पाराशर यांच्यामते सूर्य ग्रहणाच्या 12 तास आधी
आणि याच्या समाप्तीपर्यंत सूतक काल जाहीर केलेला असतो. या दरम्यान शुभ
कार्य करण्यास मनाई असते. मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. परंतू जेथे
ग्रहण दिसत नाही, तेथे सुतक काल मान्य केला जात नाही.त्यामुळे वर्षाचे
दुसरे आणि शेवटचे सुर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.त्यामुळे सूतक काल
पाळण्याची काहीही गरज नाही असे ज्योतिषाचे म्हणणे आहे.