सातारा : भाऊसाहेब हनुमंतराव कादबाने यांचे दि. 8 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 71 वर्षांचे होते.
त्यांच्या मृत्यूची माहिती समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या खळद, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. खळद या गावीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सावडणे विधी आजच साडेपाच वाजता खळद येथे होणार आहे.
दशक्रिया विधी गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी खळद या गावी, कऱ्हा नदीकाठी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.