सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात गांजा ओढणार्या दोन युवकांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागेश ईश्वर बोरगे (वय 20, रा. खिंडवाडी ता.सातारा) हा जुनी एमआयडीसी येथे गांजा ओढताना पोलिसांना सापडला.
दुसरा गुन्हा गणेश बाबासो जाधव (वय 24, रा. शिराळा जि.सांगली) याच्यावर दाखल करण्यात आला आहे. तो जुनी एमआयडीसी येथेच पोलिसांना सापडला.