पोवई नाका येथे चालत्‍या एसटीमध्ये अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग

युवकावर पोक्सोंतर्गत गुन्‍हा दाखल

by Team Satara Today | published on : 03 March 2025


सातारा : सातार्‍यातील पोवई नाका येथे चालत्‍या एसटीमध्ये अल्‍पवयीन मुलीचा हात धरुन युवकाने विनयभंग केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्‍सोचा गुन्‍हा दाखल असून संशयित युवक पसार झाला आहे. दरम्‍यान, पुणे येथील घटना ताजी असतानाच सातार्‍यात एसटीत छेडछाडीची घटना घडल्‍याने मुलींचा प्रवास असुरक्षित झाल्‍याची भावना वाढू लागली आहे.

ओंकार घाडगे असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. २ मार्च रोजी दुपारी घडली आहे. अल्‍पवयीन मुलगी एसटीमध्ये असताना संशयित आरोपीने मुलीला उद्देशून 'तू माझ्या आयुष्याचे वाटोळे केले आहे. तुला ज्यांनी माझ्यापासून लांब केले आहे त्‍यांना मी सोडणार नाही,' असे म्‍हणत मुलीचा हात धरला. या सर्व घटनेमुळे मुलगी घाबरुन गेली व एसटीमध्ये खळबळ उडाली. या सर्व घटनेनंतर मुलीच्या मैत्रिणीने फोन करुन मुलीच्या कुटुंबियांना माहिती दिली.

दरम्‍यान, कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर त्‍यांनी सांयकाळी सातारा शहर पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवकाची आत्महत्या
पुढील बातमी
राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कान, नाक व घसा यांची होणार तपासणी

संबंधित बातम्या