कराड : येथील चाटे कोचिंग क्लासेस चे प्राध्यापक रमेश तात्याराव बनकर यांना नुकताच 2024 चा राज्यस्तरीय 'शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार' इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पो. नि. संजय हारगुडे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी हक्क कृती समितीच्यावतीने प्रतिवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो. यावेळी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष केदार पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी जि. प. सदस्य आनंदराव पाटील, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष अनिल माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार आनंदराव साळुंखे तर डॉ.अतुल मोरे, प्रा. प्रदीप पाटील, चेतन पाटील, रामराजे काळे श्रीशैल पाटील, रोहित पाटील विनोद बल्लाळ, धनाजी सापकर इ. मान्यवर उपस्थित होते. यापूर्वीच प्राध्यापक बनकर यांना विविध 7 राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सदर पुरस्काराने चाटे उद्योग समूहाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सदर पुरस्काराबद्दल बनकर यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.