राज्याच्या सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता

सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांचे वक्तव्य

मुंबई : गेल्या काही दिवसांंपासून राज्याच्या राजकारणात अंतर्गत मोठ्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय बनली आहे. देवेंद्र फडणवीस आता अजित पवारांना आपल्याकडे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूर करण्यासाठी करत असल्याचे दिसत आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, यांनी आगामी दोन महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोडही होऊ शकते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने राज्याच्या सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यताही अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आरोपी असतानाही पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दमानिया यांनी नमूद केले. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविरोधात पुरावे दिल्याचेही त्यांनी सांगितले. “संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागे मोठा नेता कोण आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळलेले नाही का? धनंजय मुंडे मंत्रिपदी असताना तपासावर त्यांचा दबाव राहील. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय कधी घेणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला वगळण्यात आले होते. राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो, त्यामुळे या समितीची संपूर्ण सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आली होती. त्यांनी अजित पवार यांना यात समाविष्ट केले, मात्र शिंदे यांना स्थान दिले नव्हते. त्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली होती. अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नियमांमध्ये बदल करून एकनाथ शिंदे यांना या समितीत स्थान देण्यात आले.

दरम्यान,  मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या काही महत्त्वाच्या योजनांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळा घालण्यास सुरुवात केली आहे. हेच शिंदे यांच्या राजकीय स्थितीतील संभाव्य बदलांचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शिंदे सरकारच्या ‘तीर्थदर्शन योजना’, ‘आनंदाचा शिधा’ आणि ‘शिवभोजन थाळी’ या लोककल्याणकारी योजनांना बंद करण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याने शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या घडामोडींमुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील बातमी
सुरक्षित इंटरनेट वापराबाबत कार्यशाळा संपन्न

संबंधित बातम्या