सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुश्रित तानाजी सावंत रा. सदर बाजार, सातारा याला दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना तो कोणाच्याही लेखी परवानगीशिवाय दि. 25 रोजी मोना स्कूल ते कूपर कॉलनी रस्त्यावर आढळून आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत बॉबी उर्फ सॅमसंग अँथोनी बुक्स रा. केसरकर पेठ, सातारा याला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना तो दि. 27 रोजी चार भिंती परिसरातील मोकळ्या जागेत आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करीत आहेत.