सातारा : दळण आणण्यासाठी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली असून सातारा शहर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मिता अभय जाधव (वय 44, रा. गुरुवार पेठ) या 23 जुलै रोजी सायंकाळी दळण ठेवण्यासाठी गिरणीकडे पायी जात होत्या. कूपर कारखान्यासमोरील रस्त्यावर अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण झडप घालून लंपास केले आणि तेथून पळ काढला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून महिला पोलिस हवालदार कदम पुढील तपास करत आहेत.