सातारा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता

by Team Satara Today | published on : 31 May 2026


सातारा : शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहरात राहणारी एक वीस वर्षीय युवती राहत्या घरातून बाहेरून चहा आणते, असे सांगून निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, दि. 30 मार्च रोजी सुरज भोपाल वाघमारे (रा. कृष्णानगर, सातारा) हे राहत्या घरातून जॉब पाहण्यासाठी पुणे किंवा मुंबई येथे जातो, असे सांगून गेले आहेत. ते अजून घरी आले नाहीत. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धनगरवाडी, कोडोली येथे अवैध दारू विक्रीप्रकरणी महिलेवर कारवाई
पुढील बातमी
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपकडून धैर्यशील कदम यांची उमेदवारी जाहीर

संबंधित बातम्या