सातारा : महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा तर्फे आवाहन करणेत येते की ११ केव्ही बांबवडे उपसा सिंचन योजना कळयंत्र आवारातून निर्गमित होणाऱ्या ११ केव्ही विद्युत वाहिनीचे विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ (गाव मरोळशी, ता.पाटण, जि. सातारा) व विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजना टप्पा क्र.२ (गाव-घोट, ता. पाटण, जि.सातारा) काम पूर्ण झाले असून, ही वाहिनी दि. ०४/०३/२०२५ नंतर कधीही कार्यान्वित होवू शकते.
सदर ची वाहिनी बांबवडे, मरोळशी, गायमुखवाडी, ढोरोशी, घोटगाव व गावठानातून निर्गमित होत असल्याने सदर वाहिनीवरील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व उच्चदाब वीज वाहिन्यांचे कोणत्याही प्रकारे संपर्क येईल अशा प्रकारची कृती म्हणजे सदर वीज वाहिन्या खालून उंच लोखंडी सळया, लाकडी बांबू, लोखंडी पाईप इत्यादी कोणत्या प्रकारच्या तत्सम वस्तू नेवू नयेत. वीज वाहिन्यांच्या खांबावर चढणे, ताणावर कपडे वळत घालणे, अगर गुरे बांधणे अशी कृती करू नये. तसेच वीज वाहिन्यांच्या खांबाशी लहान मुलांना खेळू देवू नये. त्यामुळे वीज अपघात व धोका होवू शकतो.
तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास व अपघात घडल्यास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ त्यास कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही, याची कृपया सर्व नागरिकांनी व संबंधितानी नोंद घ्यावी.