साताऱ्यातील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व, साहित्यिक, कर सल्लागार अरुणराव गोडबोले यांचे निधन

अंत्ययात्रा उद्या बुधवार दि. 15 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघणार

by Team Satara Today | published on : 14 October 2025


सातारा :  येथील ज्येष्ठ कर सल्लागार, साहित्यिक, चित्रपट निर्माते आणि सातारा शहरातील ज्येष्ठ सामाजिक नेते अरुणराव रामकृष्ण गोडबोले (वय ८२) यांचे मंगळवारी दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास दु:खद निधन झाले. त्यांच्या मागे बंधू अशोक व डॉ. अच्युत, पत्नी अनुपमा, मुलगा उदयन, सून संजीवनी, एक मुलगी डॉ. गौरी ताम्हणकर, जावई डॉ. हेमंत ताम्हणकर, पुतणे प्रद्युम्न व डॉ. चैतन्य, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

येथील दि युनायटेड वेस्टर्न बँक, आयुर्वेदिय अर्कशाळा, सज्जनगडचे समर्थ सेवा मंडळ, अंत्यसंस्कार सहायक मंडळ अशा अनेक संस्थांमधून त्यांनी विविध पदांची जबाबदारी पेलली. चित्रपट निर्माते म्हणूनही त्यांनी वेगळा ठसा उमटविला. कविता, प्रवासवर्णन, ललित, संत साहित्य, अशा विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. कौशिक प्रकाशन या संस्थेमार्फत त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली.

अंत्ययात्रा उद्या बुधवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शनिवार पेठेतील निवासस्थानापासून निघणार आहे. संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिव्यनगरी परिसरात सुमारे 75 हजारांची घरफोडी; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद
पुढील बातमी
अल्पवयीन मुलांना दोरीने बांधून मारहाणप्रकरणी फलटणमधील दाम्पत्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा

संबंधित बातम्या