नारळपाणी तुम्हाला वाटते तितके आरोग्यदायी आहे का?

डॉक्टरांनी ज्येष्ठांना इशारा दिला

by Team Satara Today | published on : 13 March 2025


नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. प्रत्येक आजारी व्यक्तीला नारळाचे पाणी प्यायला देत असतो. त्याचबरोबर तुम्ही जर नारळच्या पाण्याचे सकाळी उठून सेवन केल्यास तुम्हाला पोट आणि शरीराला थंडावा तर मिळतोच शिवाय लठ्ठपणा, अपचन, डिहायड्रेशनसारख्या समस्याही दूर राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की, वयस्कर व्यक्तींनी दररोज नारळाचे पाणी पिणे चांगले नसते. त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे काही लोकांच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही जर दररोज नारळपाणी पित असाल, तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नारळपाणी सेवन करणे महत्वाचे आहे.

डॉ. जमाल ए खान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये वयस्कर व्यक्तींनी तसेच वाढत्या वयात नारळ पाणी का पिऊ नये हे सांगितले आहे. यासोबतच त्यांनी व्हिडिओमध्ये असेही सांगितले की नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वयस्कर व्यक्तींनी जर दररोज नारळ पाणी प्यायले तर त्यांच्या हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो. तसेच नारळ पाणी हे दैनंदिन दिनचर्येचा भाग नाही. मात्र तुम्ही जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर असता तेव्हा शरीराला ताजेतवाने आणि हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी पिऊ शकता.

वयस्कर व्यक्तींनी नारळ पाणी का पिऊ नये?

पोटॅशियमचे प्रमाण जास्त 

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम भरपूर असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. त्यातच काही वृद्धांमध्ये जर किडनी संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे कारण अतिरिक्त पोटॅशियम शरीरातून बाहेर पडू शकत नाही, ज्यामुळे हायपरक्लेमिया होऊ शकतो. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात.

रक्तदाबावर परिणाम 

जर एखादी वयस्कर व्यक्ती आधीच कमी रक्तदाब म्हणजेच हायपोटेन्शन या आजारांशी औषध घेत असेल, तर नारळ पाणी प्यायल्याने त्यांचे रक्तदाब आणखी कमी होऊ शकते. यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा आणि बेशुद्धी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

साखरेची पातळी वाढू शकते 

नारळाचे पाणी नैसर्गिकरित्या गोड असते आणि त्यात कार्बोहायड्रेट्स देखील असतात. त्यामुळे ज्या वयस्कर व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी जास्त प्रमाणात पिणे हानिकारक ठरू शकते कारण ते रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. व त्यामुळे चयापचय प्रक्रिया मंदावते.

पोटाच्या समस्या उद्भवू शकतात 

काही वयस्कर व्यक्तींना नारळ पाणी प्यायल्यानंतर गॅस, पोटदुखी किंवा जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पचनसंस्थेवर परिणाम करू शकतात.

हृदय आणि किडनीच्या रुग्णांसाठी धोकादाय‍क

ज्यांना आधीच हृदयरोग किंवा किडनीच्या समस्या आहेत त्यांनी मर्यादित प्रमाणात नारळ पाणी प्यावे. जास्त पोटॅशियम आणि सोडियममुळे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. नारळ पाणी पिण्याचे काही फायदे देखील आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला नारळ पाणी प्यायला आवडत असेल आणि तुम्ही स्वतःला थांबवू शकत नसाल, तर प्रथम या विषयावर डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि नंतर ते पिणे महत्वाचे आहे. तसेच, जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर नारळ पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खुटाळे इंजिनिअरींग प्रा. लि. व सिनर्जी इंजिनिअर्स अँड पावडर कोटर्स सातारा यांचा संयुक्तपणे सुरक्षा दिन-सप्ताह
पुढील बातमी
होळीच्या दिवशी चाहता महिलांनी हर्षवर्धनला दिल्या शुभेच्छा

संबंधित बातम्या