सातारमध्ये मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा...

by Team Satara Today | published on : 03 August 2025


सातारा : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था, बालरंगभूमी परिषद शाखा सातारा यांनी २ ऑगस्ट मराठी बालनाट्य दिवसाचे औचित्य साधून नाट्यशाळेचे मोफत आयोजन केले होते. सातारा शाखेबरोबरच बालरंगभूमी परिषदेच्या इतरही शाखांच्या वतीने महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या नाट्यशाळेमध्ये जवळ जवळ ३५ ते ४० बालचमूंनी सहभाग नोंदवला. या मध्ये मुलांना वाचिक अभिनय, कायिक अभिनय अश्या वेळ वेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन प्रात्यक्षिक स्वरूपात मुलांना देण्यात आले. अध्यक्ष डॉ. निलेश माने, उपाध्यक्षा सौ. रसिका केसकर, प्रमुख कार्यवाह ईशान केसकर आणि सदस्या सौ. चित्रा भिसे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात केली. रंगकर्मी सौ. चित्रा भिसे यांनी विशेष उपस्थिती नोंदवून मुलांना मोलाचे मार्गदर्शन करून रंगकर्मीय खेळ घेतले. सौ. रसिका केसकर यांनी आवाजाचे व्यायाम आणि अभिनयाचे धडे मुलांना शिकवले. डॉ. निलेश माने यांनी बालनाट्य लेखन आणि दिग्दर्शन बालकलाकारांनी कसे अवगत करावे याचे मार्गदर्शन केले. ईशान केसकर यांनी अगदी कमी वेळात मुलांचे छोटे नाटुकले बसवून सादर केले.या शिबिराचा मुलांनी खूप आनंद घेतला. या संधी निमित्त बालकलाकारांनी आणि पालकांनी बालरंगभूमीचे आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा सौ. निलमताई शिर्के सामंत आणि साताऱ्याचे ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
पुढील बातमी
क्रांतिपर्व च्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित बातम्या