सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिरवाडी ता.सातारा येथे अस्तित्व लपवल्याप्रकरणी अमिर इन्तियाज मुजावर (वय 24, रा. पिरवाडी, गोरखपूर ता.सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मच्छिंद्रनाथ माने यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी ही कारवाई 9 जून रोजी केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक मोहिते करीत आहेत.