सातारा : पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या कंटेनरचा भुईंज पुलाजवळ अपघात झाला. भुईंज पुलाजवळ कृष्णा नदी पात्रात नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. यावेळी ही घटना बुधवारी (दि.७) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन मद्यपी कंटेनर चालक त्याला ताब्यात घेतले आहे . पुढील तपास भुईंज पोलीस स्टेशन करत आहे.
दरम्यान, वारंवार पुणे- बेंगळुरू महामार्गावर अशा घटना घडत असल्याने महामार्ग पोलिसांनी आणि प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.