सातारा : औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमधून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जुन्या औद्योगिक वसाहती मधील एका कंपनीतून सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी 38 वर्षीय महिला कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.