वाठार येथे महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे; शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी संतप्त

by Team Satara Today | published on : 17 October 2025


वाठार स्टेशन : शेतीपंपांचा वीजपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून सतत खंडित होत असल्याने, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. याची महावितरणकडून दखल घेण्यात न आल्याने संतप्त शेतकर्‍यांनी वाठार स्टेशन येथील कार्यालयाला टाळे ठोकले.

वाठार स्टेशन परिसरात रब्बी हंगामातील कांदा आणि उसाची लागण सुरू आहे. महाग रोपे घेऊन, शेतकरी मजुरांच्या सहाय्याने लागण करत आहेत. या लागणीच्या रोपांना पाणी देणे आवश्यक असताना, वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. महावितरणच्या कार्यालयात तक्रारी करूनही, उपाययोजना होत नसल्याने, तळीये, जाधववाडी, विखळे येथील शेतकर्‍यांनी वाठार स्टेशन येथे महावितरणच्या कार्यालयास गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास टाळे ठोकले.

त्यानंतर काही वेळातच महावितरणचे अधिकारी तेथे दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अधिकारी व शेतकर्‍यांमध्ये चर्चा होऊन, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन महावितरण अधिकार्‍यांनी दिले. मात्र, ठोस उपाय न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सासपडे प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवला जाणार; रूपाली चाकणकर; चव्हाण कुटुंबीयांचे केले सांत्वन
पुढील बातमी
सुदेष्णाची ‘सुवर्ण’ धाव; साताऱ्याच्या शिरपेचात तुरा !

संबंधित बातम्या