धनगरवाडीत घराबाहेर लावलेली दुचाकी गायब; सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद

by Team Satara Today | published on : 09 September 2026


सातारा : तांगडे कॉलनी, धनगरवाडी, कोडोली परिसरातून रस्त्यावर उभी केलेली स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे २० हजार रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हिंदुराव चव्हाण (वय २६, रा. तळबीड, ता. कराड, सध्या रा. तांगडे कॉलनी, धनगरवाडी, कोडोली) यांनी त्यांची काळ्या व सिल्व्हर रंगाची मोटारसायकल रस्त्यावर उभी केली होती. दि. २० ऑगस्ट रोजी रात्री साडेआठपासून २१ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान ही दुचाकी चोरीला गेली.
चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा क्रमांक एमएच-५०-क्यू-१५४४ आहे. याप्रकरणी चव्हाण यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला पोलीस हवालदार सावंत अधिक तपास करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढे गावच्या हद्दीत हायवे रोडलगत नाश्त्यासाठी थांबले अन् मोबाईल, दुचाकी घेऊन चोरटे पसार
पुढील बातमी
लिंब येथील औद्योगिक डीपी फोडून ६० किलो तांब्याची तार लंपास; अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

संबंधित बातम्या