विसावा नाका येथे दुकानात घुसून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 September 2026


सातारा : सातार्‍यातील विसावा नाका येथे दुकानात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण कुलकर्णी (रा.शाहूनगर, सातारा), सचिन धादमे (रा. करंजे), अमोल डोईफोडे (रा.) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अभिजीत सुरेश रावण (वय 49, रा. संगमनगर, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 23 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता विसावा नाका येथे घडली आहे.
अभिजीत यांच्या दुकानाचे काम सुरु होते. यावेळी संशयित तिघेजण तेथे आले. संशयित व्हॉट्सअपवर मागितलेल्या 1 लाख रुपयांवर चर्चा करत होते. एका चिटफंडमधून पैसे मिळवून दिले आहेत. त्यामुळे तुम्ही मला 1 लाख रुपये द्या, असे म्हणत संशयितांनी वाद घातला. यावर अभिजीत यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडून जावून संशयितांनी तक्रारदार यांना मारहाण केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वादातून तरुणास मारहाणप्रकरणी आरोपीस सहा महिने सक्तमजुरी; बोरगाव येथील प्रकरण

संबंधित बातम्या