सातारा तालुक्यात विविध उपक्रम राबवून महसूल सप्ताहाचा शुभारंभ

by Team Satara Today | published on : 02 August 2025


सातारा : सातारा जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट  अखेर महसूल सप्ताह साजरा होत आहे. या निमित्ताने  सातारा तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ  करण्यात आला.  

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात सातारा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल  यांच्या अध्यक्षते खाली सातारा तहसिलदार  समीर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.   

महसूल दिनाचे औचित्य साधून सातारा तालुक्यातील कातकरी समाजातील एकुण 17 पात्र नागरीकांना अनुसुचित जमातीचे दाखल्यांचे वितरण करणेत आले. तसेच संजय गांधी योजना व इंदिरा गांधी  योजनेतील 7 नविन  लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले.

1 ऑगस्ट-2025 महसूल दिनाचे औचित्य साधून सातारा तालुका महसूल विभागातील नायब तहसिलदार, मंडल अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक, वाहनचालक, शिपाई, कोतवाल या संवर्गातील सुमारे 43 उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन उल्लेखनीय कामकाजाचा गौरव करणेत आला.   यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा देखील सत्कार करून  महसूल विभागाचे पूर्वीचे व सध्याचे  कामकाजाचे अनुषंगाने संवाद साधण्याची संधी दिली. 

महसूल दिन कार्यक्रमामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणेत आले होते. या आरोग्य तपासणी शिबिराचा सुमारे  220 महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार
पुढील बातमी
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

संबंधित बातम्या