सातारा : सोशल मीडियावर एटीट्युडचा स्टेटस ठेवल्या कारणावरुन लोखंडी कुकरी दाखवून दहशत माजवल्याप्रकरणी, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि. 25 रोजी रविवार पेठ भाजी मंडई येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्यात राज मुनीर फरास (वय 19, रा. रविवार पेठ, सातारा) याने फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस हवालदार देशमुख अधिक तपास करत आहेत.