पवाराची निगडी येथे दांडक्याने एकाला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 21 July 2026


सातारा : पवाराची निगडी (ता. सातारा) येथे गावात आल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी ओमकार सचिन लोंढे (रा. पवाराची निगडी) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने अनिल प्रकाश पटेकर यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार राऊत करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
आरफळ येथे रस्ता ओलांडत असलेल्या एका व्यक्तीला ट्रकची धडक; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या