सातारा : करंडी झरेवाडी, ता. सातारा येथील उसाच्या शेतात विजेचे खांब उभा करू नको असे सांगितल्याचा राग मनात धरून एकास लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे.
अमोल जाधव यांनी जगन्नाथ जाधव यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत मी येथेच खांब टाकणार आहे.तुला काय करायचे ते कर अस सांगत शिवीगाळ आणि दमदाटी केली. याप्रकरणी जगन्नाथ लक्ष्मण जाधव (वय ४९ रा. झरेवाडी, सध्या रा. अजिंक्य कॉलनी सदर बाजार सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अमोल अशोक जाधव (रा. झरेवाडी करंडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार घोरपडे करत आहेत.