घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी तालुका पोलिसांनी केली जेरबंद

by Team Satara Today | published on : 19 March 2026


सातारा : तालुका पोलिसांनी वाढे फाटा ते म्हसवे जाणाऱ्या रोडवर घरफोडीच्या तयारीत असलेल्या  ३ जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. करण ज्योतिराम चव्हाण (वय २१, रा.डबेवाडी), विकी रमाकांत उंबरे (वय २४, रा. कोडोली), व यश राजेंद्र येवले (वय २०, रा. डबेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहे. 

तिघेजण म्हसवे जाणाऱ्या रोडवर स्वतःचे अस्तित्व लपून बसले होते. त्यांच्या ताब्यात पोलिसांना एक स्क्रू ड्रायव्हर १२ इंच लांबीचा काळ्या रंगाचा एक्सा ब्लेड आणि ३० इंचाची कटावणी आढळून आली.ही कारवाई सहायक फौजदार संजय साबळे यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार स्वामी करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा मानसिक छळ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
पुढील बातमी
साताऱ्यात शनिवार पेठेत तेली खड्डा ठिकाणी जुगाराच्या अड्ड्यावर छापा

संबंधित बातम्या