सातारा : दुकानामध्ये किराणा घेण्याच्या बहाण्याने आलेल्या बुरखाधारी महिलेने दुकानाच्या काउंटरवरील महिलेचे अडीच तोळे वजनाचे दोन पदरी गंठण हाताने ओढून पलायन केल्याची घटना सागर रेसिडेन्सी शाहूनगर येथे घडली आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी माया दिलीप माने वय 53 राहणार शाहूनगर, गोडोली यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, माने हे एस. के. चव्हाण यांच्याकडे भाड्याने राहतात. त्यांचे याच इमारतीमध्ये किराणा मालाचे दुकान आहे. दुपारी दोनच्या दरम्यान मंगलमूर्ती किरणा स्टोअर्स मध्ये बुरखा घातलेली एक महिला खरेदीच्या बहाण्याने आली. काही साहित्य खरेदी केल्यानंतर उरलेले पैसे परत देण्याकरता महिला काउंटर जवळ आली आणि त्या महिलेने फिर्यादीच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे 35 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र ओढून दुकानाबाहेर हेल्मटधारी इसमाबरोबर दुचाकी वाहनावरून पलायन केले. फिर्यादी माया माने यांनी आरडाओरडा केला. मात्र दुपारच्या वेळी सामसूम असल्याने त्यांना कोणतीही मदत मिळू शकली नाही. पोलीस हवालदार एस. के. देशमुख अधिक तपास करत आहेत.
शाहूनगर मध्ये महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण लांबवले
by Team Satara Today | published on : 10 March 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात केसरकर पेठ येथील पार्किंगमधून दुचाकीची चोरी
June 04, 2026
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा
June 04, 2026
साताराऔद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमधून महिला बेपत्ता
June 04, 2026