सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर मार्गावरून राजवाडा कडे येणाऱ्या तीव्र उतारावर सध्या यादव गोपाळ पेठेत जुन्या कला व वाणिज्य महाविद्यालयानजिक मोडकळीला आलेली इमारत पालिकेने जमीनदोस्त केली. मात्र या परिसरात सध्या पडणाऱ्या संततधार पावसामुळे मोठा खड्डा आणि त्यात पाणी साठले आहे. समर्थ मंदीर वरून तीव्र उतारावरून येणारे एखादे वाहन या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्यास मोठ्या अपघातास आमंत्रण देणारे आहे. त्यामुळे तातडीने पालिकेने या परिसरात अडथळे किंवा कुंपण लावून येथे धोकादायक परिस्थिती असल्याची जाणीव वाहनचालकांना करून द्यावी अशी अपेक्षा होत आहे.
शहरातला हा जीवघेणा खड्डा धोकादायक ठरणार.!.
by Team Satara Today | published on : 22 July 2023
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा