जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या शिक्षक निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर; जानेवारीच्या अंतिम रविवारी पुरस्कार प्रदान करणार

by Team Satara Today | published on : 10 December 2025


पुसेगाव  :  सातारा  जिल्हा हिंदी   अध्यापक मंडळाच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी संभाजीनगर,सातारा येथील राष्ट्रभाषा भवनामध्ये  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील हिंदी शिक्षकांसाठी मंडळाचे पूर्व अध्यक्ष स्व. एम. आर. शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेणेत आलेल्या निबंध लेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आल्याची माहिती मंडळाचे कार्यवाह अनंत यादव यांनी दिली.

निबंधलेखन स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांकाचे मानकरी याप्रमाणे:प्रथम क्रमांक : सोनाली वारे, बी. जे. इंग्लिश मिडियम स्कूल, साखरवाडी व  पुनम गुरसाळे,सौ.सुशिलादेवी साळुंखे हायस्कुल,सातारा यांनी संयुक्तपणे पटकावला. द्वितीय क्रमांक : राजुद्दीन मुल्ला, छत्रपती शिवाजी हायस्कूल,वडूज व कपिल डोईवाडे, महात्मा गांधी विदयालय, उंब्रज यांना संयुक्तपणे देणेत आला. तृतीय क्रमांक : चंद्रकांत पवार, कमळेश्वर विद्यालय, विखळे व नेताजी ननावरे,अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालय,शाहूनगर-शेंद्रे यांनी मिळवला तर चंद्रकांत तोडरमल, श्री.कोटेश्वर विद्यालय, गोवे-लिंब व संतोष इंगळे, ना. आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर, कराड यांना क्रमश: चौथा व पाचवा क्रमांक देणेत आला.    \

या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील २३ हिंदी शिक्षक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीकांत लावंड,शिवाजीराव खामकर व सुनंदा शिवदास यांनी काम पाहिले.   स्पर्धेतील सर्व यशस्वी शिक्षकांचे मंडळाचे अध्यक्ष ता. का. सूर्यवंशी, उपाध्यक्ष, शाहनवाज मुजावर, सुधाकर माने हणमंत सूर्यवंशी, विजयकुमार पिसाळ आदींनी अभिनंदन केले.    जानेवारीच्या अंतिम रविवारी आयोजित करणेत येत असलेल्या विशेष कार्यक्रमात या स्पर्धेतील विजयी शिक्षकांना पुरस्कार प्रदान करणेत येतील असे प्रतिपादन अनंत यादव यानी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भुईमुग पिकाच्या प्रमाणित बियाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
पुढील बातमी
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात अज्ञात व्यक्तीकडून डॉक्टरला मारहाण ; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन ; कडक कारवाईची मागणी

संबंधित बातम्या