09:23pm | Sep 13, 2024 |
सातारा : सातारा शहरामध्ये 16 व 17 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन होणार असून त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. दरम्यान, या दोन दिवसांमध्ये पार्कींगबाबत सर्व सातारकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.
राजपथावर कमानी हौद - देवी चौक, मारवाडी चौक- मोती चौकापर्यंत येणारे-जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. कमानी हौद ते शेटे चौकपर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद. कर्मवीर भाऊराव पाटील पथावर शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती चौक पर्यंत येणार्या व जाणार्या मार्गावर प्रवेश बंद. मोती चौक - एम.एस.ई.बी. ऑफिस समर्थ टॉकिज - राधिका टॉकिज चौक ऐक्य प्रेस कॉर्नर - बुधवार नाका चौक- गणेश विसर्जन कृत्रीम तलाव कै. किसन बा. आंदेकर चौक, करंजे पेठ पर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद. स्टेट बैंक प्रतापगंजपेठ (काटदरे मसाले दुकान ) - डि.सी.सी. बँक - मोती तळे पर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद. मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका पर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. समर्थ मंदिर ते चांदणी चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहील.
बोगदा ते शाहू चौक हा मार्ग जड वाहनांसाठी (एस.टी.बस सह) व अवजड वाहनांसाठी बंद राहील (सज्जनगड व कास पठार कडे जाणारी व येणारी जड वाहने (एस.टी.बस सह) व अवजड वाहने बोगदा, शेद्रे मार्गे जातील व येतील. बोगदा, समर्थ मंदिराकडून चांदणी चौक मार्गे एस.टी. स्टॅन्ड साताराकडे येणारी सर्व वाहने (जड व अवजड वाहने वगळून) ही चांदणी चौक राजवाडा मार्गे न येता समर्थ मंदिर, अदालत वाडा शाहू चौक मार्गे एस.टी. स्टॅन्डकडे जातील. मोळाचा ओढाकडून सातारा शहरात येणारी सर्व वाहने ही मोळाचा ओढा, महानुभव मठ, करंजे, भूविकास बँक चौक मार्गे मार्गस्थ होतील. कोटेश्वर मंदिर - राधिका टॉकीज चौक, राधिका रोड मार्गे एस.टी. स्टॅन्ड कडे येणारी वाहने ही कोटेश्वर मंदिर - शाहुपुरी - मोळाचा ओढा मार्गे महानुभव मठ, करंजे, भूविकास बँक मार्गे एस.टी. स्टँडकडे येतील. मोती चौकाकडे जाणारी वाहने शाहु चौक अदालत वाडा मार्गे समर्थ मंदिर मार्गस्थ होतील. शेटे चौक, शनिवार चौक, जुना मोटार स्टॅन्ड मोती चौकाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने त्या परिसरात राहणार्या रहिवाशांनी आपली वाहने पर्यायी मार्गाने घेऊन जावी.
मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे येथे बुधवार नाका जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने परिसरात राहणार्या रहिवाशांनी आपली वाहने शाहूपुरी अथवा पर्यायी मार्गाने घेऊन जावीत. वरील सर्व मार्गावर रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
पार्किंगच्या व्यवस्थेबाबत गणेश विसर्जन मार्गावर राहणार्या नागरीकांनी आपली वाहने विसर्जन मार्ग सोडुन पर्यायी जागेत पार्क करावीत तसेच विसर्जन पाहण्यासाठी येणार्या नागरीकांनी आपली वाहने तालिम संघाजवळील मैदान, गुरुवार परज, गांधी मैदान, कोटेश्वर मैदान या चार ठिकाणी अथवा आपल्या पर्यायी जागेत पार्किंग करावीत, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |