सातारा : माजी नगरसेविका सौ मनिषा काळोखे आणि सामाजिक कार्यकर्ते विजय काळोखे समूहातर्फे आज सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील सौ भुजबळ यांनी लिहलेल्या पुस्तकाचे वाचन आणि वाटप करण्यात आले.
कु. श्रेया धुमाळ, कु वृषाली अनुसे यांची सावित्रीबाई फुले यांच्यावरील बीज भाषणे झाली. यावेळी नगरसेवक डी. जी. बनकर यांनी प्रभाग 16,17, आणि 18,19 मधील भागात वाचन संस्कृती ठिकाण्यासाठी एक सभागृह बांधन्यास पुढाकार घेणार असून, प्राथमिक शाळा आय एस ओ होण्यासाठी कार्यरत राहू सांगितले. तर नगरसेविका सौ हेमलता भोसले यांनी ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्यास कटीबद्ध राहू सांगितले. तसेंच सौ. अनिता फरांदे यांनी शाहीर फरांदे यांचा वैचारिक वारसा जरूर चालवू सांगितले.
यावेळी वरील मान्यवरांसहित नगरसेवक सुशांत महाजन, विनोद मोरे,नगरसेविका सौ पुनम निकम, सौ वैशाली राजे भोसले यांचा कामाठीपुरा परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय काळोखे, नगरसेविका मनिषा काळोखे, प्रमोद म्होरकर,सागर कुदळे, उमेश गोरे, सुबोध गोरे, सचिन लोखंडे, स्मित काळोखे, वैभव फरांदे,अमोल बनकर, अमोल नलावडे, प्रकाश घुले यांनी परिश्रम घेतले.
यावेळी विष्णुपंत गोरे, गोविंद गोरे, अशोक गोरे, नारायण गोरे, किसन गोरे, नंदकुमार गोरे, सौ कमल माळी,श्री शिंदे, नंदकुमार राऊत, दत्तात्रय जायकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश वैदू, अशोक जावळीकर सौ स्वाती काळोखे, सौ सुनीता फरांदे, श्रीमती यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती पवार यांनी तर प्रस्तावना श्री. किशोर काळोखे यांनी व आभार श्री. अरुण शिर्के यांनी मानले. उपस्थिताना सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.