सातारा : शाहूपुरी ते कोंडवे खिंड रस्त्यावरील दिव्यनगरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे 75 हजारांच्या रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. नऊ ते दहा दरम्यान अनंत उर्फ गोपाळ वसंत काळे (रा. वृंदावन कॉलनी, दिव्यनगरी, सातारा) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 72 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.